बुधवार, १६ सप्टेंबर, २०२६

श्री. गणेश ज्ञानोबा घाटूळ सर यांना बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'शारदा प्रतिष्ठानचा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार


 नाथापूर प्रतिनिधी - जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तालखेड येथे कार्यरत असणारे शिक्षक श्री. गणेश ज्ञानोबा घाटूळ सर यांना बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'शारदा प्रतिष्ठानचा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार' आज शिक्षकदिना दिवशी मा.डॉ.श्री.केशव खटिंग (सुप्रसिद्ध कवी तथा विचारवंत,परभणी), मा.श्री.अमरसिंहजी पंडित (कार्यवाह, शारदा प्रतिष्ठान) व उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.

 सरांनी सातारा जिल्ह्यातील दुर्गम अशा पाटण तालुक्यात 8 वर्षं सेवा केलेली आहे. त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच विविध उपक्रम राबवून इयत्ता पाचवीचा वर्ग वाढ तसेच भौतिक सुविधा व वृक्षारोपण केले. त्या ठिकाणचे विद्यार्थी आज चांगल्या पदावर काम करत आहे.

त्यानंतर स्वजिल्हातील माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील शाळेत 11 वर्ष सेवा उत्कृष्ट केली आहे. त्या ठिकाणी सुद्धा बंद पडलेले पाचवी, सहावी आणि सातवी असे तीन वर्ग पालक, शालेय व्यवस्थापन समिती व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांच्या कार्यकाळात पुन्हा सुरू झाले आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

 सध्या ते जि.प.कें.प्रा.शाळा तालखेड येथे कार्यरत असून विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून विद्यार्थी गुणवत्तेबरोबरच शाळेच्या भौतिक सुविधामध्ये वाढ करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

 प्रत्येक शाळेत विविध उपक्रम राबवून पटसंख्या वाढ करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच विविध सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे.

यापूर्वीही त्यांना रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटी तर्फे दिला जाणारा 'राष्ट्रशिल्पकार पुरस्कार' तसेच गेल्या वर्षी माऊली पतसंस्था माजलगाव कडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

घाटूळ सरांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाचा, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पणाचा हा गौरव होत आहे.त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे

आपला मोबाईल हरवला,काळजी करू नका,बीड पोलिसांनी केले तीन वर्षांत २२४० मोबाईल नागरिकांना परत.

 हरवलेल्या मोबाईलसाठी केंद्रीय नोंदणी प्रणाली ठरली आशेचा किरण बीड पोलिसांची प्रभावी कामगिरी; २०२६ मध्ये सप्टेंबरअखेर १,३३० मोबाईल शोधण्यात य...